बदलावं लागेल! आज मी सोलापूर पुणे महामार्गावरून घरी परत येत होतो. नेहमी प्रमाणे प्रवासाचे आनंद घेत, पावसाची वाट बघत गाडी चालवत होतो . हे सगळं छान चालू असतांना एक अपघात बघितला . नेमकं काय झालं हे लांबून समजले नाही पण काही तरी विचित्र घडलं आहे हे लक्ष्यात आलं माझ्या. जवळ जाऊन बघतो तर एका कार ने जोरात धडक दिऊन एका कुत्र्याला जबरदस्त जखमी केलं होते. मी माझी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतलो आणि विचार करायला लागलो काय करायचं. लगेच गाडीतून खाली उतरलो आणि त्याच्या जवळ गेलो. तो कुत्रा रक्त्याच्या थारोळ्यात तडफडत होता. त्याला कसं आणि कुठं लागलं ह्यांच्यावर आपण बोलूच नये. ज्याक्षणी मी त्याच्या जवळ पोचलो तो मला पाहून शेपूट हलवू लागला. ते पाहून माझ्या डोळयांतून अश्रू काही थांबेना. त्याला इतकं लागलेलं असताना हि तो त्याच मनुष्यवर च प्रेम दाखवू लागला. माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र परिस्तिथी होती ती. ज्या गाडी ने हा अपघात केला, ती नं थांबता निघून गेली. काळ खूप वेगाने पुढे जात आहे हे मला हि मान्य आहे पण वेगाने पुढे जात असताना एकदा तरी मागे वळू...